Panduranga ; पांडुरंगाच्या कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Panduranga ; निमगाव/जळगांव (साक्षीदार न्युज) ; – गाव लहान आहे की मोठे यापेक्षा गावाची गरज पाहून निधी दिला आहे. माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे पक्ष विरहित काम करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. प्रत्येक गावातील तळागाळातील जनतेशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. ग्रामपंचायत कार्यालय व निमगाव गावाजवळील पुलालागत संरक्षक भिंतीचे काम मंजूर करून लवकरच सुरु करणार आहे. पांडुरंगाच्या कार्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसून सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे पाणीपुरवठा व स्वछता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. ते निमगाव येथे काल झालेल्या सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

- Advertisement -

यावेळी श्री विठ्ठल मंदिर आवारात गौण खनिज अंतर्गत मंजूर केलेले सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन विधिवत पूजा करून जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निमगावचे नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच अक्षय पाटील, , उपसरपंच शोभाताई धनगर, ग्रामपंचायत सदस्य भूषण पाटील, आशाताई धनगर, मंगल भिल तसेच भजनी मंडळाचा यांचा शाल श्रीफळ देवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सरपंच अक्षय पाटील यांनी गावात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती विषद केली. सूत्रसंचालन कृषी सहायक सचिन बाविस्कर यांनी केले तर आभार लोकनियुक्त सरपंच अक्षय पाटील यांनी मानले.

टाळ मृदंगाच्या गजरात पालकमंत्र्यांचे स्वागत
गावांत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिष बाजीत, टाळ मृदंगाच्या गजरात व पांडुरंगाच्या नाम घोषाने गावातून दिंडी मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले. या प्रसंगी महिलांनी पालकमंत्र्याचे औक्षण केले. शाल श्रीफळ व बुके देऊन ग्रामपंचायत, श्री. विठ्ठल भजनी मंडळ व ग्रामस्थांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचा असा सत्कार केला.

- Advertisement -

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील , विभाग प्रमुख युवराज पाटील , लोकनियुक्त सरपंच अक्षय पाटील, उपसरपंच शोभाताई धनगर, ग्रामपंचायत सदस्य भूषण पाटील, अनिताताई धनगर , अंकुश भिल , पोलीस पाटील योगेश महाजन, प्रवीण पाटील, कृष्णा पाटील, हेमंत धनगर, प्रशांत धनगर, जगदीश महाजन, सोपान पाटील, नाशिराबादचे माजी सरपंच विकास पाटील, शहर प्रमुख विकास धनगर , चेतन बर्हाटे, चंदू भोळे, हायस्कूलचे चेअरमन योगेश पाटील, , भजनी मंडळाचे दिलीप पाटील, गणूदास महाजन , ज्ञानदेव पाटील, उखर्डू महाजन, बेळीचे ग्रा.प. सदस्य संजय नाले, मधुकर नाले, पोलीस पाटील दिनेश पाटील, आशुतोष पाटील , प्रमोद राजपूत यांच्यासह निमगाव, बेळी, भागपुर व नाशिराबादचे पदाधिकारी , ग्रामस्थ, भजनी मंडळ व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Panduranga

👉🏽 भारतीय वायु दलाचे विमान आज सायंकाळी 7.00 वा. पर्यंत जळगाव विमानतळला पोहचणार

👉🏽 नेपाळ दुर्घटनेतील जखमींना घेऊन वायू सेना रवाना

👉🏽 नेपाळ येथे अपघातात 27 भाविक ठार

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS