back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

भालोद येथील शाळेने जतन केलेली बाबासाहेबांची स्मृती नव्या पिढीस प्रेरणा देत राहील : जयसिंग वाघ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भालोद ( sakshidar news ) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टार्ट समितीचे सभासद असताना दिनांक २२ ऑक्टोबर १९२९ रोजी भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल ला भेट देऊन तसा शेरा लिहिलेला आहे . बाबासाहेबांनी लिहिलेला तो शेरा सदर संस्थेने जतन करून ठेवला आहे . बाबासाहेबांची ती भेट एक ऐतिहासिक तसेच शासकीय बाब असल्याने तो शेरा पुढील पिढीस नक्कीच प्रेरणा देत राहील असे विचार प्रसिध्द साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले.बाबासाहेबांच्या भालोद भेटीचे औचित्य साधून वाघ यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह भालोद येथील न्यू इंग्लिश स्कूल ला भेट दिली , बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले व सदर भेटी विषयीची माहिती दिली .

- Advertisement -

जयसिंग वाघ यांनी आपल्या भाषणात पुढं सांगितले की , बाबासाहेब मुंबई प्रांतातील अस्पृश्य व आदिवासी समाजाच्या सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक विकासाचा अभ्यास करून त्यांच्या विकासार्थ ब्रिटिश सरकारला आवश्यक उपाय योजना सुचविण्या करिता स्टार्ट समितीच्या माध्यमातून या गावी आले होते . या भेटीत त्यांनी अस्पृश्य समाजातील मुलांना शिक्षण घेणे कसे अनिवार्य आहे या बाबत मार्गदर्शन केले आहे . शिक्षणाचा मूलमंत्र आपण प्रत्यक्षात आणून बाबासाहेबांचे स्वप्न साकार करावे असेही वाघ यांनी स्पष्ट केले.प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सपकाळे यांनी सांगितले की बाबासाहेब एवढ्या ग्रामीण भागात येवून आपल्याशी संवाद साधत होते , मार्गदर्शन करीत होते या वरून बाबासाहेबांना आपल्या विषयी केवढी तळमळ होती हे दिसून येते . मुख्याध्यापक डी. व्ही. चौधरी यांनी सांगितले की पाच वर्षांनी बाबासाहेबांच्या या ऐतिहासिक भेटीस १०० वर्षे पूर्ण होतील तेंव्हा या संबंधाने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल . बाबासाहेबांचा हा शेरा आमच्या संस्थेस नेहमीच नवी ऊर्जा देत आला आहे .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदन तायडे यांनी तर आभारप्रदर्शन डी. एस. सुरवाडे यांनी केले . सामाजिक कार्यकर्ते समाधान सुरवाडे , व्यवस्थापक शांताराम भालेराव , पर्यवेक्षक आर. एस. जावळे , एस. एम. तायडे , पंकज वानखेडे आदींसह शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्यासंख्येने हजर होते .

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS