पुतण्यासह पोलीस काकाला देखील चाकूने वार !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ७ नोव्हेबर २०२३ | राज्याच्या उपराजधानी नागपूर शहरात अनेक दिवसापासून सातत्याने गुन्हेगारी घटना घडत असतांना अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक पोलीस हवालदार आणि त्याच्या पुतण्यावर समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला केला आहे. पोलिसांनी आरोपी श्रीरत्न फुले या आरोपीला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार वैभव गणेश श्रावणे (गणेश नगर) हा फरार आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार गणेश नगर येथील राजीव गांधी उद्यानाजवळ रविवारी रात्री दारू पीत होते. दरम्यान, यश देवराव ठवकर (तिरंगा चौक, सक्करदरा) हा तेथे पोहोचला. त्याचा आरोपींसोबत वाद झाला. आरोपींनी यशवर दारूच्या बाटलीने हल्ला केला. डोक्यावर व छातीवर वार करून गंभीर जखमी केले. तसेच छातीवर चाकूने वार केले. यशने फोन करून काका सुनील ठवकर यांना घटनेची माहिती दिली. सुनील हे गुन्हे शाखेच्या युनिट चारमध्ये हवालदार म्हणून कार्यरत आहेत. ते लगेच तिथे पोहोचले. त्यांना यश रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

हातात चाकू घेऊन दोन्ही आरोपीदेखील तेथे उपस्थित होते. सुनीलने आरोपीला यशवर हल्ला करण्याचे कारण विचारले. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी तुलादेखील वर पोहोचवतो असे म्हणत सुनीलवरही चाकूने वार केले. पोलिस कर्मचारी आणि त्याच्या पुतण्यावर हल्ला झाल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकारी आणि कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. सुनील ठवकर यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याचा जबाब नोंदवता आला नाही.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS