उताऱ्यावर नाव लावण्यासाठी अधिकाऱ्याने घेतली २ हजाराची लाच !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ३ नोव्हेबर २०२३ | कुठलेही सरकारी काम करण्यासाठी पैसे न देण्याचे नेहमीच सरकार आवाहन करीत असते पण राज्यातील अनेक जिल्ह्यात महसूल व पोलीस विभागात लाच घेण्याच्या घटना नियमित घडत असतांना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील जवखेडा येथील एका मंडळ अधिकाऱ्याने २ हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना शिरपूर तालुक्यातील जवखेडा येथील मंडळ अधिकारी मुकेश श्रीकांत भावसार याला रंगेहाथ पकडण्यात आले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. वरुळ (ता. शिरपूर) शिवारात असलेल्या शेतजमिनीची वाटणी करण्यावरून तक्रारदार आणि त्याची बहीण यांच्यात वाद होता. त्यांच्यात वाटणी करण्याबाबत शिरपूरच्या वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने आदेश दिला होता. या आदेशाची प्रत जोडून तक्रारदाराने तहसीलदारांकडे मागणी अर्ज सादर केला. संबंधित तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी अर्जावर कार्यवाही करून सातबाऱ्यावर नावनोंदणी करून दिली. नोंदणीचे काम पूर्ण केल्यानंतर त्याच्या मोबदल्यात मंडल अधिकारी मुकेश भावसार यांनी तक्रारदाराकडे दोन हजारांची लाच मागितली.

मात्र तक्रारदाराने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. विभागातर्फे तक्रारीची खात्री करत दोन हजार रुपये स्वीकारताना गुरुवारी संशयित भावसार यांना पकडण्यात आले. मंडल अधिकारी यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरु आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS