साक्षीदार | २४ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्याची खूप गरज असल्याने अनेकदा शेतकऱ्यांचे पाणी नसल्याने मोठे नुकसान देखील होत असते. पण आता एक महत्वाची निकाल आल्याने शेतकऱ्यांचे संकट दूर होणार आहे.
आता सर्वोच्च न्यायालयात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांमधून मराठावाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठीच्या हस्तक्षेप याचिकांवर सुनावणी झाली. या सुनावणीत जायकवाडी धरणात नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांतून पाणी सोडण्याच्या निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर मराठवाड्यात पाणी सोडण्याचा मार्ग मोकळ झाला असून जायकवाडीतून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे राज्य सरकारने आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी सांगितली आहे.