साक्षीदार | १३ नोव्हेबर २०२३ | देशात गेल्या काही महिन्यापासून बदलत्या हवामानामुळे अनेक भागात पावसाच्या सरी कोसळत आहे. राज्यात पुढील 24 तासांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
देशासह राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. राज्यासह देशात विविध ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. राज्यात थंडी पडण्यास सुरुवात झाली असून नोव्हेंबरच्या शेवटी थंडीचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
राज्यात गेले काही दिवस अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. दरम्यान, मुंबईसह, पुणे, सातारा आणि कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी रविवारी तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. दुपारी मात्र उन्हाचा चटका बसत होता.