साक्षीदार | १८ ऑक्टोबर २०२३ | देशभरात बाप्पांच्या स्वागतापासून अनेक सण उत्सव सुरु झाले आहे. तर येत्या महिन्यात दिवाळी सण देखील येत आहे. यात शेतकऱ्यांना नेहमीच केद्र व राज्य सरकार मदतीचा आधार देत आहे. तर सर्व सामान्य नागरिकांना दिवाळीपूर्वीच आनंदाचा शिधा वाटप करीत असल्याने राज्यातील नागरिकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. पण तेलाच्या किमतीत देखील वाढ होवू लागल्याने नागरीक मोठ्या संकटात सापडले आहे.
राज्यातील बाजारात सोयाबीनची भावपातळी आज काहिशी वाढलेली दिसते. बाजारात येणाऱ्या सोयाबीनमधील ओलावा कमी येत आहे. तसेच सोया तेलाला काहीसा आधार मिळाला. यामुळे सोयाबीनची भावपातळी सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान झाली. सोयातेलाला आणखी आधार मिळाल्यास सोयाबीनच्या दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारात देण्यात येत आहे.