रिक्षाचालक भयभीत : मध्यरात्री रिक्षाचे चाके होवू लागली गायब !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १४ ऑक्टोबर २०२३ | जळगाव शहरातील शिवाजी नगर – दुध फेडरेशन रोडवरील खडके चाळ व इंद्रप्रस्थ नगरमधील नामदेव नगर मध्यरात्रीच्या सुमारास ४ रिक्षांचे प्रत्येकी दोन चाके काढून अनोळखी चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या प्रकरणी रिक्षाचालकांनी शहर पोलिसात धाव घेतली होती.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शिवाजी नगर – दुध फेडरेशन रोडवरील खडके चाळ व इंद्रप्रस्थ नगरमधील नामदेव नगर परिसरात दि.१३ रोजी मध्यरात्री २ ते ५ वाजेदरम्यान काही अनोळखी चोरट्यांनी नामदेव नगर परिसरातील १०० मीटर अंतरात असलेल्या चार रिक्षांचे प्रत्येक दोन चाके काढून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेत अफसर शेख सत्तार(वय२४), प्रमोद मांडोळे,(वय ३५), महेंद्र पाटील, शाहरुख शेख यांच्या रिक्षांचा समावेश आहे. पहाटेच्या सुमारास रिक्षाचालक रिक्षा काढून जात असतांना हा प्रकार आढळून आला त्यावेळेस एकाच गल्लीत दोन रिक्षांची चाके काढली होती तर त्यापुढील गल्लीत अशीच घटना घडली होती. MH.19.CW.2194, MH.19.C.5558, MH.19.CW.2999, MH.19.V.5658 या घटनेत एका रिक्षा चालकाचे किमान ४ हजार ते ५ हजारपर्यत नुकसान झाले आहे. असे एकूण २० हजारापर्यतची रिक्षाची चाके घेवून चोरटे फरार होण्यात यशस्वी झाले आहे. सकाळी ७ वाजेच्या सुमारास काही रिक्षाचालकांनी शहर पोलिसात धाव घेतली होती. यानंतर किशोर निकुभ हे घटनास्थळी येवून काही परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी देखील करीत होते. शेवटचे वृत्तहाती आले तेव्हा जळगाव शहर पोलिसात चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या घटनेमुळे परिसरातील रिक्षाचालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS