साक्षीदार | २३ ऑक्टोबर २०२३ | देशभरातील अनेक तरुण तरुणी पदवीचे शिक्षण घेवून देखील सरकारी नोकरी मिळत नसल्याने खाजगी क्षेत्रात काम करीत आहे पण अशाच तरुणांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत सहायक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक या पदांच्या एकूण ८१ रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
पदाचे नाव – सहायक व्यवस्थापक, उपव्यवस्थापक
एकूण पदसंख्या – ८१
शैक्षणिक पात्रता –
व्यवस्थापक – पदव्युत्तर पदवी
उपव्यवस्थापक – B.Sc, BE/ B.Tech in ECE/ EEE/ CSE/ IT, M.Sc, MCA, पदव्युत्तर पदवी
वयोमर्यादा –
सहायक व्यवस्थापक – २१ ते २८ वर्षे.
उपव्यवस्थापक – २१ ते ३० वर्षे.
अर्जाची पद्धत – ऑनलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ नोव्हेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – http://www.railtelindia.com
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक – https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/85961/Index.html
पगार – सहायक व्यवस्थापक – ३० हजार ते १ लाख २० हजार रुपयांपर्यंत.
उपव्यवस्थापक – ४० हजार ते १ लाख ४० हजार रुपयांपर्यंत.