‘भारत माता कि जय’, ‘महायुतीचा विजय असो’ घोषणांनी रॅलीमध्ये आनंदाचे वातावरण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

आ. राजूमामा भोळेंनी तुकाराम वाडी, जानकी नगर, कासमवाडी भागात साधला संवाद

- Advertisement -

जळगाव (सुनील भोळे) : – महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शनिवारी संध्याकाळी दुसऱ्या टप्प्यात तुकारामवाडी, जानकी नगर, गणेशवाडी मार्गे पंचमुखी हनुमान मंदिर येथे संवाद रॅली काढली. या रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. ‘भारत माता कि जय’, ‘महायुतीचा विजय असो’ अशा विविध घोषणांनी आणि जल्लोषाने रॅली मार्गातील वातावरण प्रफुल्लित झालेले होते. नागरिकांच्या या उत्साहाने आणि समर्थनाने आ. राजूमामा भोळे यांनी शहरात जनकल्याणाची कामे अधिक जोमाने करण्याचा निर्धार व्यक्त केला.

'Bharat Mata Ki Jai

- Advertisement -

शनिवारी दुसऱ्या टप्प्यात पांडे डेअरी चौकातील रामदेव बाबा मंदिर येथे दर्शन घेऊन आ. भोळे यांनी भेटींना सुरुवात केली. तेथून तुकाराम वाडी, महादेव मंदिर परिसर, जानकी नगर, गणेशवाडी, मंजुषा हौसिंग सोसायटी, कासम वाडी मार्गे पंचमुखी हनुमान मंदिर येथे समारोप करण्यात आला. रॅलीदरम्यान आ. भोळे यांनी महेश पाटील, शांताराम सूर्यवंशी, वृत्तपत्र विक्रेते विलास वाणी आदींच्या घरी भेटी दिल्या. तसेच, जानकी नगरात मोठे भाऊ अरुण भोळे यांनी त्यांना गोड दही खाऊ घालून विजयासाठी आशीर्वाद दिले.

'Bharat Mata Ki Jai

रॅलीमध्ये खा. स्मिता वाघ, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, मंडळ क्रमांक ७ चे अध्यक्ष गोपाल पोपटानी, माजी नगरसेवक मंगला चौधरी, शिवसेनेचे माजी नगरसेवक कुंदन काळे, ॲड.शुचिता हाडा, मनोज आहुजा, माजी महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदीप रोटे, मंडळ सरचिटणीस विनय केसवानी, महेश पाटील, संदीप बाविस्कर, योगेश बागडे, हेमंत जोशी, प्रसन्न बागल, भूषण काकडे, विजय पाटील, दिनेश प्रजापत, सौरभ महाजन, सुशील जगताप, पंकज गागडे, नंदिनी दर्जी, कल्पना मावळे, उषा परदेशी, ज्ञानेश्वरी कांडेलकर, शिवसेनेचे पियुष कोल्हे, स्वप्नील परदेशी, उमेश सोनवणे, अमर ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्चना कदम, ममता तडवी, रिपाई आठवले गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, मिलिंद अडकमोल, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजू मोरे, महानगर जिल्हाध्यक्ष कल्पेश मोरे, लोकजनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS