साक्षीदार | १० नोव्हेबर २०२३ | गेल्या काही वर्षापासून राज्यातील अनेक जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीना टार्गेट करून त्यांच्यावर अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना एक धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील वांद्रे परिसरातील शाळेत काम करणाऱ्या एका नराधम शिपायाने ५ शाळकरी मुलींचा विनयभंग केला.
या प्रकरणी पीडित मुलींनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली. शाळा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. रॉमबोस बावीकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपी शिपायाचं नाव आहे. या संपूर्ण घटनेनंतर परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. पाचही पीडित मुली एकाच शाळेत शिक्षण घेतात. आरोपी शिपाई देखील याच शाळेत काम करतो.
शाळेत सहामाई परीक्षा असताना आरोपीने पाचही मुलींसोबत आक्षेपार्ह संभाषण केले. इतक्यावरच न थांबता आरोपीने मुलींना फोन करून त्याचा सोशल मीडियावरही पाठलाग केला.२ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत हा संपूर्ण घडला. सुरुवातील पाचही मुलींनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, आरोपी अधिकच त्रास देत असल्याने त्यांनी या प्रकाराची तक्रार शाळा प्रशासनाकडे केली. शाळा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.