back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी : युवकांच्या मोठ्या सहभागात महायुतीच्या रॅलीला प्रतिसाद

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आ.राजूमामा भोळे यांनी घेतले बळीराम पेठ, शनिपेठ, समता नगर, छ.संभाजीनगर, नेहरू नगर भागात नागरिकांचे आशीर्वाद

- Advertisement -

जळगाव (सुनिल भोळे) : – ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत, युवकांच्या मोठ्या सहभागाने भाजप शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी दि. १७ नोव्हेंबर रोजी दिवसभरात बळीराम पेठ, शनिपेठ, छ.संभाजीनगर, समता नगर, नेहरूनगर भागात रॅली काढली. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी नागरिकांना अभिवादन करीत त्यांचे आशीर्वाद घेतले व भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

Mahayuti rally

- Advertisement -

सकाळी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात आ. राजूमामा भोळे यांनी जिल्हा परिषदेच्या पत्र्या हनुमान मंदिर येथून प्रचार सुरु केला. त्यानंतर तहसील कार्यालय गल्ली, ब्राह्मण सभा गल्ली, गुरुनानक नगर, काट्या फाईल, गवळीवाडा, बळीराम पेठ मार्गे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या घरी भेट देऊन समारोप केला. दरम्यान, आ. राजूमामा भोळे यांनी माजी उप महापौर करीम सालार, दिवंगत हाजी गफार मलिक यांच्या घरी भेट दिली.मार्गात नागरिकांनी पुष्पहार घालून, महिला भगिनींनी औक्षण करीत भरभरून आशीर्वाद दिले.

Mahayuti rallyMahayuti rally

तर दुपारी दुसऱ्या टप्प्यात समता नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून प्रचार रॅली काढली. तेथून देवेंद्र नगर परिसर, संभाजी नगर, नित्यानंद नगर, त्र्यंबक नगर परिसर, मोहन नगर, नेहरू नगर मार्गे जीवन मोती सोसायटी येथे समारोप करण्यात आला. मार्गात जेष्ठ नागरिकांशी भेटीगाठी करून महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी राहण्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आवाहन केले.

 

दोन्ही रॅलीत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगळे, शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे, भारतीताई सोनवणे, चेतन सनकत, मुकुंदा सोनवणे, जितेंद्र मराठे, सुरेखा तायडे, शिवसेनेचे ज्योती चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख, राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र प्रमुख फिरोज शेख, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजूभाई मोरे, रिपाई (आठवले) गटाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, भाजप मंडळ क्रमांक २ चे अध्यक्ष राहुल घोरपडे, मंडळ क्र. ९ चे अध्यक्ष महेश कापूरे, भाजप अल्पसंख्याक महानगराध्यक्ष अशफाक खाटीक, जगदीश नेवे, कल्पेश सोनवणे, नीलेश तायडे, शुभम तायडे, शालिक सपकाळे, संदीप ढंढोरे, प्रमोद नगरकर, उदय भालेराव, प्रमोद नगरकर, सचिन दुनाखे, अश्विन भोळे, ललित भोळे, रुपेश पाटील, आशिष जोगी, ललित परदेशी, गजानन परदेशी, प्रेमल पटेल, सुरज पवार, अशोक ढंढोरे, सुभाष बेंडवाल, सुभाष जावळे, माणिकचंदजी जावळे, कल्लू बारसे, संजय ढंढोरे, सुभाष चव्हाण, शिवसेनेचे पियुष कोल्हे, कुंदन काळे, स्वप्नील परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे साजिद पठाण, कौसर काकर, अर्चना कदम, ममता तडवी, शोभा भोईटे, फैजान पटेल, कामिल शेख, रिपाई (आठवले) गटाचे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद सोनवणे, अविनाश पारधे, मिलिंद सोनवणे, प्रताप बनसोडे, नाना भालेराव, अक्षय मेघे, लोक जनशक्ती पक्षाचे मनोज निकम, आनंदा सोनवणे आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Big News Ration Card | केंद्राचा मोठा निर्णय: 1.17...

Big News Ration Card | साक्षीदार न्यूज  | केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत (NFSA) स्वस्त धान्य योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 1.17 कोटी रेशनकार्डधारकांना...

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

RECENT NEWS