भरधाव वाहनाने दुचाकीस्वाराला उडविले !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ; – कामावरून दुचाकीने घरी जात असतांना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावानजीक सोमवारी १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करतार तोताराम पवार वय ४८ रा. मांडवे दिगर ता.भुसावळ ह.मु. कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

- Advertisement -

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, करतार पवार हे आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात राहत होते. ते एमआयडीसीतील मकरा एजन्सी येथे सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होते. नेहमीप्रमाणे सोमवारी १५ जानेवारी रोजी रात्री १० वाजता कामावरून घरी जाण्यासाठी दुचाकीने निघाले. कुसुंबा गावाच्या काही अंतरावरून येत असतांना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत करतार पवार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मलाबाई, दोन मुले संभाजी, ईश्वर आणि मुलगी भारती असा परिवार आहे.

Speeding vehicle 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Nashirabad Police | दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह...

Nashirabad Police साक्षीदार न्यूज | नशिराबाद | गेल्या काही दिवसांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाला जेरबंद करण्यात नशिराबाद पोलिसांना यश आले...

Yawal Police | यावल पोलिसांचा मोठा धडाका! रात्रीच्या काँबिंगमध्ये...

Yawal Police यावल | मिलिंद जंजाळे | शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी यावल पोलीस स्टेशनतर्फे दिनांक २३ मार्च रोजी रात्री उशिरापर्यंत विशेष काँबिंग ऑपरेशन...

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

RECENT NEWS