यावल ( साक्षीदार न्यूज ) :- तालुक्यातील महल खेडी येथील यावल आजारातील बसचालक व त्याचे कुटुंब विजयादशमी निम्मित महेलखेडी गावात बसची सजावट फुलांनी करून तिचे पूजन करीत आनंद व्यक्त करीत असल्याची परंपरा गेल्या सोळा वर्षापासून करीत असल्याने तालुक्यात सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे महेलखेडी गावात चालक व वाहक यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येते,
यावर्षी देखील बस पूजन चा मान चालक सुनील जगगनाथ महाजन व छाया सुनील महाजन यांचा मुलगा भावेश महाजन याची भाग्यश्री महाजन मोठा मुलगा काशिनाथ महाजन यांची सपना महाजन व वाहक तुषार सुरेश कापले व सौ सोनल कापले मुलगा लक्षित ,पुनीत या दाम्पत्याने देण्यात आला त्यांच्या हस्ते यावल हरिपुरा या बस चे पूजन करण्यात आले या वेळी चालक एस जे महाजन व वाहक अकिल तडवी महेलखेडी गावातील महाजन परिवार 16 वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत या उपक्रम प्रसंगी तुषार येवले आशिष्य झुरकले ललित कापले गुंजन महाजन नरेंद्र महाजन कपिल झुरकले अशोक तायडे अब्दुल देशमुख लोकेश येवले व महेलखेडी ग्रामस्थ उपस्तीती होती








