Ultraguru ; कहाणी एक ध्येयवेडा अल्ट्रागुरु ह्याची

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Ultraguru ; जर का जीवनात ध्येय आणि सात्यत असेल तर माणूस काही ही करू शकतो हे आपण पुस्तकात वाचतो पण ही खरी कहाणी आहे जळगाव रनर्स ग्रुपचे सदस्य गुरूप्रसाद तोतला ह्याची…

- Advertisement -

आयुर्वेदीक औषधीचा व्यापार करणारा आमचा हा गुरु सुरुवातीचा २०१६-१७ काळापासूनच टीम जेआरजी सौबत रन करायला लागला.सुरुवातीला ५ किमी,१० किमी मग हळू हळू हाफ मॅरेथॉन म्हणजे २१ किमी पूर्ण केली.टाटा मुंबई मॅरेथॉन मधे पूर्ण मॅरेथॉन म्हणजे ४२ किमी पाच तासाचा आत पूर्ण केल्या नंतर त्याने जगातली अत्यंत खडतर,कठीण लडाख येथील खरदुंगला अल्ट्रामॅरेथॉन कळे आपला मोर्चा वळवला, त्या साठी त्त्याने प्रैक्टिस,आहारवर नियंत्रण,जिम ट्रेनिंग वर भर दिला. प्रचंड मेहनतचा भरोसावर हे लक्ष सुद्धा पूर्ण केले ह्याचा साठी परिवाराची पूर्ण साथ होतीच.

मग आता त्याचा प्रश्र्न होता की आता पुढे काय?आणि लक्ष केले लवासा येथील १००किमी ची अजुन एक अल्ट्रा मॅरेथॉनचे.

- Advertisement -

गुरु ने आपल्या सोबत सीरियस रनर्सची जणू एक फौजच उभी केली…डॉ.राहुल महाजन,सम्राट शर्मा,पुनीत भल्ला, सौरभ आडवाणी,भाविक जैन,प्रशांत कोठारी म्हणजे गुरुचा गोतवळा. हे लोक कायम गुरु सोबत रन करताना दिसत होते…कायम त्याचे सपोर्ट सिस्टम…. रनिंग करताना पैर उठावो…पैर उठाव हे त्याचे फेव्हरेट वाक्य.

गुरु कुठल्या ही कार्यकामात असेल रनिंग शिवाय दुसरा कुठला ही विषय नसेल…कायम लोकांना नेहमीच प्रोत्साहित करेल,मोटिवेट करेल २१ करा…४२करा… …मी करू शकतो तर कोणी बी करु शकतो…सब लोग रन करो आणि रेग्युलर प्रैक्टिस को आयो बाकी काही ही नाही.

इवन प्रैक्टिस रन करतानासुद्धा आपला ट्रेनिंग शेड्यूल पूर्ण करेल म्हणजे करेल…एकटा तासांनतास रन करत राहिल पण सोडणार नाही (ह्याचा साक्षीदार मी एक आहे) कारण लक्ष होता लवासा अल्ट्रा १००किमी चे.

रन चा दिवशी लवासा येथील पावसासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आले तरी ह्या पाठ्याने सलग १३ तास प्रचंड पावसात सुद्धा हार न मानता १४ तासात हे अल्ट्रा मॅरेथॉन पण पूर्णजिद्धी ने फतेह केली.

आज गुरुपूर्णिमाचा दिवशी गुरु ने अख्या भारतात जळगाव चे नाव रोशन केले…जळगाव रनर्स ग्रुप चे नाव मोठे केले ह्याचे आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे…आज पूर्ण टीम जीआरजी अत्यंत उत्साही आहे आणि सर्वे जण आज आपला संडे लाँग रन तुझा साठी गुरु असे सांगत आहे..हे सर्व किती प्रेरणादायी आहे…खरच खूप जबरदस्त काम केले ह्या आमचा रनरने.

गुरु तुझे अभिनंदन मित्रा, देव तुला खूप बळ देवो,खूप शक्ती देवो आणि सदैव आनंदी रहा हेच सांगतो.

डॉ.रवि हिरानी
टीम जीआरजी सदस्य
दौड़ो ज़िंदगी के लिए

Ultraguru 

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS