सावखेडा शिवारातील देवनगर येथील शेतातून मोबाईल टॉवरच्या साहित्यांची चोरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज ; – जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातील देवनगर येथील शेतातून मोबाईल टॉवरचे १४ हजार रूपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे २८ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास समोर आले आहे. याप्रकरणी रविवारी ४ जानेवारी रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातील देवनगर येथील शेतात एअरटेल कंपनीचे टॉवर बसविण्यात आलेले आहे. या ठिकाणी कंपाऊंच्या आवारात कंपनीच्या मालकीचे काही साहित्य ठेवण्यात आलेले आहे. दरम्यान २८ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या ठिकाणी ठेवण्यात आलेले १४ हजार रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर देखरेख ठेवणारे कर्मचारी राजेश शामकांत पाटील वय ५० रा. निवृत्ती नगर, जळगाव यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. त्यानंतर जळगाव तालुका पोलीसांशी संपर्क साधून चोरी झाल्याबाबत माहिती दिली. पोलीसांनी चोरीच्या ठिकाण येवून घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर कर्मचारी राजेश पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रविवारी ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ धनराज पाटील हे करीत आहे.

 

Theft Mobile Tower

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS