ट्रॅक्टरचालकाने केली मॅकेनिकला तरुणाला बेदम मारहाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ९ नोव्हेबर २०२३ | ट्रॅक्टरचालकाने गॅरेजवरील मॅकेनिकला तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आव्हाणा गावात घडली. तसेच मारहाण करीत तरुणाला जीवेठार मारण्याची देखील धमकी दिली आहे. याप्रकरणी तालुका ‘पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील आव्हाणा येथे आरीफ मलीक शरीफ मलीक (वय ३०) हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. आरीफचे गावातच असलेल्या गॅरेजवर मॅकनिकचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजात त्याच्या गॅरेजवर नितीन पाटील उर्फ पपई रा. आव्हाणा ता.जि.जळगाव हा तिथे आला. त्याचे रस्त्यावर बंद पडलेले ट्रॅक्टर दुरूस्ती करण्याचे आरीफ याला सांगितले. त्यावर मला दुसरे काम सुरू असल्याने तुझे काम करू शकत नाही असे आरीफने सांगितले. याचा राग आल्याने नितीन पाटील याने आरिफला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर आरिफ मलीक याने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी नितीन पाटील उर्फ पपई याच्या विरोधात दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS