साक्षीदार | ३० नोव्हेबर २०२३ | भुसावळ शहरातील थडा मारुती मंदिरात सुमिरण रामायण मंडळाची स्थापना तरुणाईतच करणारे सुधीर दत्तात्रय डहाळे (वय ७७, रा. विखे चौक, रावेर) हे तीर्थयात्रा करून गावी परतत असताना त्यांचा वाटेतच हृदयविकाराने मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच- सहा दिवसांपूर्वी द्वारका, सोरटी सोमनाथ, नागेश्वर, गिरनार या तीर्थक्षेत्रांची तीर्थयात्रा आटोपून बुधवारी (दि. २९) परतीच्या प्रवासात घरी येत असताना त्यांचे वाटेतच ज़ळगाव ते भुसावळ दरम्यान हृदय विकाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे. सुधीर डहाळे हे सुमिरण रामायणा मंडळाचे संस्थापक सदस्य आहे तब्बल ५० ते ६० युवा श्रीराम भक्तांच फळी त्यांनी उभी केली आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा प्रामुख्याने सहभाग असायचा. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा तुषार डहाळे, सून नातवंडे, असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.