भावी लेफ्टनंट कर्नलचा दुर्देवी मृत्यू !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १९ ऑक्टोबर २०२३चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील तरुणाने एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील ४० दिवसात भारतीय सेनेत लेफ्टनंट कर्नल पदावर डेहराडून येथे रुजू होणाऱ्या तरुणाचे बॉक्सिंग खेळात डोक्यात मार लागल्याने निधन झाले. प्रथमेश गोरख महाले असे या तरुणाचे नाव आहे. प्रथमेशचे वडील गोरख महाले आणि आई शीतल महाले हे पिंपळनेर, ता. साकरी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या प्रथमेश हा स्क्वेंड्रॉन कॅडेट कॅप्टन (एससीसी) या पदावर कार्यरत होता. प्रथमेशने एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर येत्या ४० दिवसात भारतीय सेनेत लेफ्टनंट कर्नल पदावर रुजू होणार होता. पण, खडकवासला येथे प्रशिक्षणादरम्यान बॉक्सिंग या खेळात डोक्याला मार लागला व त्याला पुणे कमांड हॉस्पिटलला नेण्यात आले होते. पण, शर्थीचे प्रयत्न करूनही पहाटे ४ वाजता त्याचे निधन झाले. गुरुवारी सकाळी ९ वाजता प्रथमेशवर सायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS