‘गडकरी’ चित्रपटाचा या दिवशी होणार ट्रेलर प्रदर्शित

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १४ ऑक्टोबर २०२३ | देशभरात अनेक नेत्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले आहे. पण आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कारकीर्दीवर आधारीत ‘गडकरी’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १६ ऑक्टोबरला सोमवारी प्रदर्शित

- Advertisement -

केला जाणार आहे. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार दत्ता मेघे आणि क्रिक्रेटर उमेश यादव उपस्थित राहणार आहेत.

 

- Advertisement -

या चित्रपटात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भूमिका नागपूरकर असलेल्या राहुल चोपडा यांनी तर ऐश्वर्या डोरले यांनी कांचन गडकरी यांची भूमिका साकारली आहे. शिवाय गडकरींच्या मित्राची आणि कुटुंबातील सदस्यांची भूमिकाही नागपुरातील कलावंतानीच साकारली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर आधारित ‘गडकरी’ हा चित्रपट २७ ऑक्टोबरपासून सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होत असताना या चित्रपटाचा प्रिमियर शो सोमवारी होणार आहे. या चित्रपटाचे ८० टक्के चित्रीकरण नागपुरात करण्यात आले आहे. या चित्रपटात गडकरी यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील काही प्रसंग, त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता युवा मोर्चामध्ये त्यांनी केलेली कामे. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या मित्र मंडळींचा त्यांना लाभलेला सहवास आणि त्यानंतर राजकीय क्षेत्रात सुरू झालेला विविध टप्प्यांवरचा प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS