साक्षीदार | ६ नोव्हेबर २०२३ | फरसाण व्यापाऱ्याची त्याच्या वाहनचालकासह दोन जणांनी दीड लाखात फसवणूक केली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कायगाव येथील मधुर मिलन फ्रुट प्रॉडक्ट या कंपनीचे व्यवस्थापक संभाजी सयाजी गिलबिले यांना पाचोरा येथील एकाने फोन करुन ८०० किलो वेफर्स आणि ३०० किलो नमकीनसाठी फोनवरुन ऑर्डर दिली. यानंतर एक लाख ५२ हजार रुपयांच्या वरील वस्तू कंपनीने वाहनचालक आखेसिंग सोह्यासिंग यांच्या जबाबदारीवर पाचोरा येथे रवाना केल्या आणि फोन करणाऱ्या दिला. इसमाच्या ताब्यात यानंतर व्यवस्थापकाने चालकास संपर्क केला असता संबंधिताने वस्तू घेतल्या आणि वाहन घेऊन गेला आणि आता त्याचा संपर्क होत नसल्याचे वाहनचालकाने सांगितले. यावरुन गिलबिले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फोन करुन वस्तू घेणारा व वाहनचालक अशा दोघांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत