साक्षीदार | १५ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयातील वार्ड बॉयने एका २६ वर्षीय रुग्णाचा रुग्णालयात विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका विरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका खाजगी रुग्णालयात एक २६ वर्षीय महिला नियमित उपचारासाठी आली असता रुग्णालयात डॉक्टर नसताना एका वार्ड बॉयने त्या महिलेला कुठल्याही उपचाराची गरज नसताना तिला जनरल वार्डमध्ये घेवून जात दि. १४ नोव्हेबर २०२३ रोजी सकाळी ८.३० ते ९.३० वाजे दरम्यान चुकीचे कृत्य केल्याने महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न झाली याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात एका वार्ड बॉय विरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोहेकॉ.वंदना राठोड हे करीत आहेत.