माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, सुरेश सोनवणे, विजय पाटील, अतुल बारी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी.
जळगाव (साक्षीदार न्युज ) : – पिंप्राळा परिसरात आषाढी एकादशीनिमित्त रथ उत्सव परंपरेनुसार साजरा करण्यात येतो. रथ उत्सव साजरा करत असताना अनेक अडचणी सामोरे जावे लागत होतो त्यातली मुख्य अडचण ही रस्त्याची व रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत खांबांची होती.

त्या अनुषंगाने माजी नगरसेवक चंद्रकांत कापसे, सुरेश सोनवणे,विजय पाटील व अतुल बारी यांच्या माध्यमातून महायुती सरकारच्या विशेष निधीतून रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी विशेष निधी मंजुर होऊन रस्ता काँक्रिटी करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. त्याच माध्यमातून विद्युत खांब स्थलांतरित करण्याची मागणी सर्व ग्रामस्थ व वाणी पंचमंडळ मार्फत करण्यात आली होती त्या अनुषंगाने पाठपुरावा करून विशेष निधी मंजूर होऊन आषाढी एकादशी पुर्वी विद्युत काम स्थलांतरित करण्याचे काम मार्गी लागणार असल्याने रथाचा मार्ग सुकार होणार असल्याची भावना पदाधिकारी व ग्रामस्थांनी व्यक्त केला.








