साक्षीदार | ३ नोव्हेबर २०२३ | घराशेजारी असलेल्या तरुणासोबत १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे गेल्या वर्षभरापासून प्रेम संबध निर्माण झाले होते त्यानंतर तिच्यासोबत तरुणाने अनेकदा शारिरीक संबध निर्माण करून तिला गर्भवती केल्याची घटना उघड झाली असून अल्पवयीन मुलीला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी अडावद पोलिसात एका विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.१ ते ३१ मार्च २०२३ या महिन्याभरात तरुणाने चोपडा व जळगाव येथील त्याच्या मित्राच्या रूमवर तर अल्पवयीन मुलीच्या घरी येवून देखील वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला आहे. या प्रकरणी अडावद पोलिसात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि.गणेश बुवा हे करीत आहेत.