साक्षीदार | २२ नोव्हेबर २०२३ | जगभरातील अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत असतात, त्यात अनेक व्हिडीओ अपघाताचे असतात तर काही व्हिडीओ रेल्वे स्थानकावरील लोकल व मेट्रोचे असतात असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत एक व्यक्ती चक्क सापला किस करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक तरुण हळू हळू सापाजवळ जातो. काही वेळाने त्याच्यासमोर असलेल्या सापाचे तो चुंबन घेतो.
आश्चर्यकारक बाब म्हणजे सापानेही तरुणजवळ आल्यावरही काहीही प्रतिक्रिया न देता काहीच केले नाही. तरूण तब्बल काही मिनिटांसाठी या सापाचे चुंबन घेत राहीला आहे. या तरुणाच्या चेहऱ्यावर कुठेही सापाबद्दलची भीती आपल्याला दिसत नाही. सदर व्हिडीओ हा @snake_lover_narasimha या इन्स्टांग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.
सापाला नुसंत पाहिलं तरी अनेकांचा थरकाप उडतो. प्रत्येकजण सापाला पाहिलं की आधी आपला जीव वाचवण्याचं बघतात. पण या व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहिला नसेल. व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अक्षकश:कमेंट्सचा पाऊस केला आहे. व्हायरल व्हिडीओला हजारोच्या घरांत व्हूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर एक यूजरने लिहीले आहे की,’सुपर सर पण काळजी घ्या’ तसंच आणखी एका यूजरने लिहील आहे,’ मस्तच..एकदम भारीच..’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.