साक्षीदार | २२ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक मुलीसह विवाहितेचा विनयभंग होत असल्याच्या घटना ताजी असतांना नाशिक शहरात देखील अशीच एक घटना घडली आहे. भाजीपाला विक्रीसाठी बसण्याच्या वादातून दोघांनी युवतीस मारहाण करीत विनयभंग केल्याची घटना पाथर्डी फाटा भागात घडली. याप्रकरणी दोघा भाजीपाला विक्रेत्यांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.२० रोजी सायंकाळी पाथर्डी फाटा परिसरातील म्हाडा बिल्डींग समोर भरणा-या भाजीबाजारात पीडिता आपले दुकान मांडत असतांना संशयित आरोपी पप्पू (२०) आणि किरण (२२) यांनी भाजीपाला विक्री करण्यासाठी बसण्याच्या वादातून तिघा भाजीपाला विक्रेत्यांमध्ये वाद झाला. यावेळी दोघा तरूणांनी पीडितेस अंगावरील कपडे फाडण्यात आले असून तिला देखील मारहाण करीत तिचा विनयभंग केला. पुढील तपास उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.