खेडी खुर्द येथील रेशन दुकानातून गव्हाच्या गोण्यांची चोरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार न्युज ; – जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथे शासकीय रेशनदुकानातून २ क्विंटल रेशनच्या गव्हाच्या गोण्यांची चोरी झाल्याचा प्रकार बुधवार १४ फेब्रुवारी रोजी १ वाजता घडला आहे. या प्रकरणी चौकशी अंती अखेर शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द येथे सुनील मधुकर पाटील यांचे शासकीय रेशनदुकान आहे. याठिकाणी शासनाने वितरित करण्यासाठी दिलेला गहू आणि तांदूळ ठेवण्यात आला आहे. दरम्यान १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता संशयित प्रमोद उर्फ गंप्या आनंदा सोनवणे रा. खेडी खुर्द याने शासकीय दुकानातून २ क्विंटल रेशनच्या गव्हाच्या गोण्यांची चोरी केली. चोरी झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर दुकानदार सुनील पाटील यांनी चौकशी सुरू केली. दरम्यान चौकशीअंती ही चोरी प्रमोद सोनवणे यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दुकानात काम करणारा किशोर पाचपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवार १६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित आरोपी प्रमोद उर्फ गंप्या आनंदा सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल मोरे हे करीत आहे.

Ration Shop

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS