साक्षीदार | २४ ऑक्टोबर २०२३ | आज दसऱ्यानिमित राज्यात ठाकरे – एकनाथ शिंदे व पंकजा मुंडे या दिग्गज नेत्यांच्या सभा होत आहे. भगवान गडावर आज पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केल्याने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी सरकारला आपले पावर दाखवून दिली आहे. गेल्या काही वर्षापासून भाजप पक्ष मुंडे यांना डावलत असल्याने गेल्या महिन्यात पंकजा मुंडे यांनी राज्य दौरा केला होता. त्यानंतर हि त्यांची पहिलीच सभा आहे. त्यामुळे जनतेचे लक्ष त्यांच्या सभेकडे लागून आहे.
पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या कि, मी कधीही उतणार नाही, मातणार नाही, आणि घेतलेला वसा कधीही सोडणार नसल्याचा निर्धार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आता मैदानात उतरणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. पडले ते झाले, आता मी भ्रष्ट्राचाऱ्याला पाडणार असल्याचे देखील ते म्हणाले. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक सरकारकडून अद्याप तयार झाले नाही. मात्र, आता ते बनऊ नका, तर त्या ऐवजी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणारी जादूची कांडी बनवा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला केले. तर ऊसतोड कामगारांना न्याय दिल्याशिवाय पुढच्या दसऱ्या मेळाव्याला मी तोंड दाखवणार नाही,मी नीतीमत्ता गहाण ठेवू शकत नाही. तुम्ही पैसे जमा केले, तेव्हा मला कळाले की, बँकांची नाही, तर तुमची कर्जदार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागते, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी लोकांची माफी मागितली. काहींना पद प्रतिष्ठा मिळते, मण माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.