बॅगेत बॉम्ब आहे ; धावते विमान उतरविले खाली अन सत्य आले बाहेर !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २१ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही महिन्यापासून मुंबई विमानतळावर बॉम्ब असल्याच्या धमक्या येत आहेत. त्यातच आता याच विमानतळावर एका प्रवाशाने मोठा गोंधळ घातलाय. तरुणाने आपल्या बॅगेत बॉम्ब असल्याचा दावा देखील केला आहे. आकाशात उडत असलेल्या विमानात बॉम्ब असल्याचं समजताच इतर प्रवाशांची धांदळ उडाली. आपला जीव वाचवण्यासाठी सर्वजन पळापळ करू लागले. शेवटी विमान उतरल्यावर सत्य समोर आले आहे.

- Advertisement -

दि.२० रोजी शुक्रवारी अकासा एअरलाइन्सचे विमान पुण्याहून दिल्लीतकडे जाणारे विमान मध्येच मुंबईला थांबवण्यात आले. या विमानात एका प्रवाशाने मोठा गोंधळ घातला. माझ्या जवळ असलेल्या बॅगेत एक बॉम्ब आहे असं तो तरुण ओरडत होता. विमान थांबवा मला खाली उतरू द्या अशी ओरड त्याने लावली होती. बॅगेत बॉम्ब असल्याचा प्रवाशाने दावा करताच मुंबई विमानतळावर गोंधळ झाला. विमान तात्काळ उतरवण्यात आले. पुढे बीडीडीएस मार्फत त्याच्या बॅगेची तपासणी करण्यात आली. तपासणीत ही अफवा असल्याच स्पष्ट झालं आहे. पुढे तपासात तरुणाच्या मित्राने सांगितले की, त्याची तब्येत ठिक नसल्याने तो अशापद्धतीने ओरडत होता. विमानातून उतरल्यावर तरुणावर योग्य तो औषधोपचार करण्यात आला. तरुणाजळ कोणताही बॉम्ब आढळलेला नाही. मात्र त्याने उडवलेल्या अफवेमुळे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS