त्यांना अटक करायला हवी ; मंत्री राणे !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ३० नोव्हेबर २०२३ | राज्यात नुकतेच वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती असून 3 डिसेंबरनंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यावर प्रकाश आंबेडकरांना अटक करुन त्यांची चौकशी करायला हवी, असे मत भाजप नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यावर नारायण राणे म्हणाले, प्रकाश आंबेडकरांवर FIR दाखल करुन त्यांना अटक करायला हवी. दंगलीसारख्या महत्त्वाच्या घटनांबाबत कुणी माहिती लपवत असेल तर तो गुन्हा आहे. दंगलीचा आधार काय? हे त्यांनी सांगायला हवे. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याची दखल पोलिसांनी घ्यायला पाहीजे. ते कोणत्या माहितीच्या आधारावर हे बोलत आहे, याचा तपास पोलिसांनी करायला हवा. राज्यात दंगल घडू नये, यासाठीची ही खबरदारी बाळगायला हवी.

पुढे प्रकाश आंबेडकरांवर टीका करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, राजकीय दृष्ट्या संपलेले लोक आता का बोलत आहेत, समजत नाही. त्यांनी घरात बसावे. राज्यात अनेक ठिकाणी दंगलग्रस्त परिस्थिती आहे. तीन डिसेंबरनंतर राज्यात दंगलीची मोठी शक्यता आहे. पोलिस ठाण्यांना सतर्कतेची सूचनाही देण्यात आली आहे. चार राज्यांतील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर काहीही होऊ शकते, असे प्रकाश आंबेडकर मंगळवारी पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS