साक्षीदार | ३० ऑक्टोबर २०२३ जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनी येथील रहिवासी अनिल मधुकर वाणी (६०) हे कुटुंबातील सर्वजण आजारी असल्याने घराला कुलूप लावून कुटुंबासह रुग्णालयात गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरातून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण एक लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना २५ ऑक्टोबर रोजी रात्री घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी शनिवार, २८ ऑक्टोबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा चालक असलेले अनिल वाणी यांच्या घरातील सर्व सदस्य आजारी असल्याने ते २५ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेऊन एक लाख ४५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला