Ramanandnagar Police ; पिंप्राळ्यात चोरट्यांनी बंद घर फोडले; ६० हजारांचा ऐवज लांबविला रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Ramanandnagar police जळगाव (साक्षीदार न्यूज ) : – येथील पिंप्राळा परिसरातील विद्यानगरात बंद घर फोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ६० हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १३ जुलै रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरुवारी, १८ जुलै रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

पिंप्राळा परिसरातील विद्यानगरात सपना अभिषेक जैन (रा.भोपाळ, मध्यप्रदेश) यांचे वडिल छगनलाल शांतीलाल सव्वालाखे यांचे घर आहे. काही दिवसांपासून त्यांच्या वडिलांचे घर बंद होते. त्यामुळे अज्ञात चोरट्यांनी त्याचा फायदा घेत बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ५९ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. ही घटना सपना जैन यांना समजली. त्यांनी जळगावात येवून घरात पाहणी केल्यावर घरात चोरी झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. सुशील चौधरी करीत आहे.

उमेद अभियानात मोठा घोटाळा उघडकीस येणार ?

Ramanandnagar Police

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS