चोरट्यांनी एमआयडीसीतील कंपनीच फोडली !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ६ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरापासून नजीक असलेल्या एमआयडीसीतील के-सेक्टर मध्ये एक नवीन पत्राचे शेड उभारलेले अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास ते फोडून ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिरसोली रोड परिसरातील रहिवासी सिद्धार्थ अशोक अग्रवाल (वय-३२) यांचे एमआयडीसी मधील के-सेक्टरमध्ये कागद बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल तयार करण्याचा व्यवसाय करतात. दरम्यान त्यांनी नवीनच पत्राचे शेड भाड्याने घेतले असून या शेडमध्ये युनिट उभारण्याचे काम सुरू आहे. या युनिट उभारण्यासाठी मशीनला लागणारे सामान इलेक्ट्रिक मोटार, ईलेक्ट्रीक पाण्याची मोटार, ब्रेकर मशीन आदी साहित्य आणून ठेवले होते.

३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शेडमध्ये सामान ठेवून शटरने बंद केले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यां या शेडमधून इलेक्ट्रिक मोटार, पाण्याची मोटर, इलेक्ट्रिक केबल आणि काँक्रीट ब्रेकर्स असा एकूण ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आला. दरम्यान सिद्धार्थ अग्रवाल यांनी सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS