जळगावातील दागिन्याचे दुकान चोरट्यांनी फोडले !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २४ नोव्हेबर २०२३ | जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून चोरी दरोडे सारख्या घटना नियमित घडत आहे. जळगाव शहरातील जोशीपेठ भागातील ज्वेलर्सचे दुकान फोडून एकूण १० लाख ७७ हजार रुपये किमतीचे १८९ ग्रॅम सोने व सोन्याचे रॉ मटेरियल चोरून नेल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील जोशीपेठमधील संभव ज्वेलर्स या दुकानात ही घटना घडली. आदर्श नगरात किशोर ओमप्रकाश वर्मा हे वास्तव्यास असून त्यांचे जोशीपेठ परिसरातील काळभैरव मंदिराजवळ संभव ज्वेलर्स नावाने सोन्याचे दुकान आहे. दुकानाच्या पहिल्या मजल्यावर वर्मा यांचे ऑफिस आहे तर दुसऱ्या मजल्यावर सोन्याचे दागिने बनविण्याचे काम सुरू असते. त्यांच्याकडे आठ बंगाली व इतर कारागीर असून ते गेल्या अनेक वर्षांपासून वर्मा यांच्याकडे सोन्याचे दागिने तयार करण्याचे काम करतात. त्यातील चार कारागीर हे गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी गावी निघून गेले आहेत. किशोर वर्मा यांनी त्यांच्याकडे काम करणारा कारागीर मिलन चित्तरंजन पाकिरा याला दोन ते तीन दिवसांपूर्वी १०० ग्रॅम तर सुधार मदन सामंत याच्याकडे १०० ग्रॅम तर सुशांत राधानाथ मायती याच्याकडे ४८ ग्रॅम सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी दिले होते. मंगळवारी दिवसभर काम केल्यानंतर वर्मा हे रात्री ८.३० वाजता तर त्यांचे कारागीर हे रात्री १० वाजता दुकान बंद करून त्यांच्या रूमवर निघून गेले होते. पहाटे सव्वा चार वाजता चोर घुसल्याची मिळाली माहिती. बुधवारी पहाटे सव्वा चार वाजेच्या सुमारास किशोर वर्मा यांना त्यांच्या दुकानाजवळ राहणाऱ्या अनिल वर्मा यांनी तुमच्या दुकानात चोर घुसल्याची माहिती दिली.

त्यानुसार वर्मा हे वडील व मोठ्या भावाला घेऊन तत्काळ दुकानावर आले. यावेळी त्यांना दुकानाचे लहान शटरचे कान तर आतील चॅनल गेट कोयंडे तुटलेले दिसले. त्यांनी दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन पाहणी केली. चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावरील ऑफिसचा दरवाजा तोडून त्या ठिकाणी असलेल्या कारागिरांच्या ड्रॉवरचे लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेले १८९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रॉ मटेरियल असा एकूण १० लाख ७७ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा किशोर ओमप्रकाश वर्मा यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे करत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Blood Donation Camp | वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम! सारिका ताई...

Blood Donation Camp | साक्षीदार न्यूज | श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त २२ मार्च रोजी रक्तदान...

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

RECENT NEWS