माजी सैनिकाच्या घरात चोरट्यांची दिवाळी ; लाखोंचा मुद्देमाल लंपास !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १७ नोव्हेबर २०२३ | जळगाव शहरातील पिंप्राळ्यातील मंगलमूर्ती नगरातून बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे, चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख ३५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी समोर आली. याप्रकरणी बुधवारी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मंगलमूर्ती नगर येथील माजी सैनिक जगदीश काशिनाथ पाटील (वय ४३) हे दीपावलीच्या निमित्ताने १३ नोव्हेंबर रोजी ते परिवारासह घराला कुलूप लावून गावाला गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी हीच संधी साधत बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख ३५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी उघडकीला आला. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरात सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.

बुधवारी दुपारी ३ वाजता जगदीश पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Kingaon PHC | किनगावात गरोदर मातांच्या जीवाशी खेळ; एकाच...

Kingaon PHC किनगाव | मिलिंद जंजाळे | एकीकडे सरकार 'सुरक्षित मातृत्व' आणि 'डिजिटल इंडिया'च्या गप्पा मारत असताना, जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे मात्र मानवतेला काळिमा...

Jalgaon Banana Price | केळी दरात मोठी घसरण! जळगावातील...

Jalgaon Banana Price जळगाव | मिलिंद जंजाळे | जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर आर्थिक अडचणीत सापडले असून, बाजारात मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे नाराजी वाढत...

Rural Hospital Issue | किनगावमध्ये आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा! पीएम...

Rural Hospital Issue यावल | मिलिंद जंजाळे | तालुक्यातील किनगाव येथे आरोग्य व्यवस्थेची गंभीर अवस्था समोर आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेअभावी रुग्णांची तपासणी...

RECENT NEWS