शेतकऱ्यांच्या ३२ क्विंटल कपाशीवर चोरट्यांनी मारला डल्ला !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १९ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक जिल्ह्यात चोरीच्या घटना घडत असतांना आता चोरट्यांनी शेतकऱ्यांना देखील चुना लावत असल्याची घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे. राज्यात कपाशीला दर नसल्याने अनेक शेतकरी संकटात सापडले आहे त्यामुळे शेतकरी दिवाळी आल्यावर देखील कपाशीची घरात साठवणूक करून ठेवली असतांना त्यावर आता चोरटे डल्ला मारू लागले आहे. चिंचखेडा या गावातून तब्बल ३२ क्विंटल कपाशी चोरीला गेल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, म्हसदी- चिंचखेडे रस्त्यावर चिंचखेडे येथील शेतकरी केदार रामचंद्र पाटील यांची बागायती शेती आहे. पाटील यांचे शेतातच घरही आहे. शेतातील घरालगतच शेतातील माल व शेतीची अवजारे ठेवण्यासाठी शेड उभारली आहे. या पत्र्याच्या शेडमध्ये सुमारे ३२ क्विंटल कपाशी पोत्यामध्ये भरून ठेवली होती. सध्या कपाशीला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांनी कपाशी संग्रही ठेवली आहे. परंतु शेळमध्ये ठेवलेला हा कापूस आता सुरक्षित नसल्याचे जाणवू लागले आहे.
लक्ष्मीपूजन अर्थात दिवाळीच्या मध्यरात्रीस चोरट्यांनी पोत्यात भरून ठेवलेली कपाशी लंपास केली. सकाळी श्री. पाटील शेतात गेल्यावर हा प्रकार लक्षात आला. श्री. पाटील कुटुंबीयांनी साक्री पोलिसांना घटनेची माहिती दिली. सध्या भुरट्या चोऱ्यांच्या घटना वाढल्या असून, पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS