साक्षीदार | १७ ऑक्टोबर २०२३ | भारताचे उद्योगपती असलेले रतन टाटा यांचे नेहमीच खाजगी आयुष्य अनेकांना माहित नाही, तरी देखील त्यांचे खाजगी आयुष्याचे अनेक किस्से सोशल मिडीयावर वाचायला मिळत असतात. तर भारतीय सिनेमातील एका अभिनेत्रीला ‘द लेडी इन व्हाइट’ या नावानं ओळखलं जातं. बोल्ड व बिनधास्त अभिनेत्रीने 50 वर्षांपूर्वी मोठ्या पडद्यावर असे सीन दिले की पाहणारेही थक्क झाले. अत्यंत सुंदर असलेल्या या अभिनेत्रीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांच्या अभिनयाचे लाखो दिवाने होते. लहान वयात ती अनेक देश फिरली. तिच्या अभिनयासोबतच तिच्या अफेअर्सची देखील खूप चर्चा झाली. या अभिनेत्रीचं नाव आहे सिमी ग्रेवाल. सिमी ग्रेवाल यांनी आज वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया या अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्यातील एक रंजक किस्सा.
अभिनेत्री सिमी ग्रेवालने ‘कर्ज’ आणि ‘मेरा नाम जोकर’ सारख्या चित्रपटांमधून दमदार अभिनय करत स्वतःची ओळख निर्माण केली. तिच्या करिअर इतकीच लव्ह लाईफचीही चर्चा झाली. अनेक अफेअर्स आणि लग्न होऊनही आज सिमी ग्रेवाल एकटीच राहिली. तिचा पती रवी मोहन याच्यापासून घटस्फोट झाला. सिमी ग्रेवालने बिझनेसमन रवी मोहनशी लग्न केले.पण हे लग्न काही वर्षेच टिकले. लग्नाच्या दहा वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेतला.
लग्नापूर्वी सिमी ग्रेवाल जामनगरच्या महाराजांना डेट करत होती. त्यावेळी ती फक्त 17 वर्षांची होती. पण फार कमी लोकांना माहित असेल की सिमी ग्रेवाल एकेकाळी रतन टाटासोबत रिलेशनशिपमध्ये होती. सिमी ग्रेवालने एका मुलाखतीत रतन टाटासोबतचे तिचे प्रेम आणि नातेसंबंध याविषयी उघडपणे भाष्य केलं होतं.
सिमी गरेवालने दिलेल्या मुलाखतीत, ती रतन टाटा यांना डेट करायची असा खुलासा केला होता. दोघांचे अनेक वर्ष संबंध होते. रतन टाटांचे कौतुक करताना सिमी ग्रेवाल म्हणाली होती की, ‘रतन आणि माझे खूप जुने नाते आहे. तो परिपूर्ण आहे. त्याची विनोदबुद्धी अप्रतिम आहे आणि तो एक परिपूर्ण गृहस्थ आहे. त्याच्यासाठी पैसा कधीच महत्त्वाचा नव्हता. परदेशात तो जेवढा रिलॅक्स आहे, तेवढा तो भारतात निवांत नाही.’
रिपोर्ट्सनुसार सिमी ग्रेवाल आणि रतन टाटा यांना एकमेकांशी लग्न करायचे होते. दोघांनी एकत्र अनेक स्वप्ने पाहिली होती. पण काही कारणास्तव हे दोघे एकत्र येऊ शकले नाहीत. नंतर, रतन टाटा सिमी गरेवालच्या शोमध्ये देखील सहभागी झाले होते. जिथे त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उघड केली होती. तेव्हा रतन टाटा यांनी लग्न आणि नात्याबद्दल ‘असे अनेक प्रसंग आले होते जेव्हा ते लग्न करणार होते. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.’ असा खुलासा केला होता. सिमी ग्रेवाल यांनी रतन टाटासोबतचे तिचे नाते का तुटले हे कधीच सांगितले नाही, पण तरीही ती त्यांचा आदर करते. सिमी ग्रेवाल कोणत्याही प्रसंगी रतन टाटांचे कौतुक करायला चुकत नाही.