BJP Leader ; मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोमात सुरू आहे. अशाच भाजपच्या एका मोठ्या नेत्याने दिलेली मुलाखत चर्चेतआली आहे. या मुलाखतीत त्यांनी संगितले कि , विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या लागणाऱ्या निकालात कोणत्या आघाडीला किती जागा मिळणार आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज भाजपचे नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या कडून वर्तवण्यात आला आहे. त्यांनी सांगितले कि विधानसभा निवडणुकीबाबत एक मोठा बदल होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळेस सांगितले .
एनडीटीव्हीच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विनोद तावडे यांनी विधानसभा निवडणुकीबाबत अनेक पैलूंवर आपली मते त्यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत कसे चित्र असणारआहे यावर बोलताना त्यांनी पुढे सांगितले कि , लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा फक्त .०३ टक्के जास्त मिळाली. प्रत्येक होणाऱ्या निवडणुकीत एक थर्ड फ्रंट असतो त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत होईलच असे नाही . पण विधानसभा निवडणुकीत मात्र होत असतो. या तिसऱ्या आघाडीत असलेले पक्ष ५ ते १० हजार मते घेतात किंवा काही ठिकाणी विजयी देखील होतात. आपण जर चाललेली आजची परिस्थिती बघितली तर लोकसभेसारखीच देखिल असणार आहे असे आपण ग्रृहीत धरले तर जो फायदा लोकसभेत मविआला झाला तसा फायदा महायुतीला देखील होईल. तावडे हे बोलतांना म्हणाले कि , पुढे या विभाजनाचा फायदा महायुतीला होईल . पण आता लाडकी बहीण या योह=जनेमुळे परिस्थिती आता चांगलीच बदलेली आहे .
राज्यातील निवडणुकीच्या निकालाबाबद अंदाज व्यक्त करताना तावडे यांनी सांगितले कि , महायुतीला स्पष्टबहुमत मिळेल . राज्यात महायुतीला १५५ ते १६० जागा मिळतील. त्यापैकी भाजपला सर्वाधिक ९० ते १०० जागा मिळतील . तर शिवसेना शिंदे गटाला ४० आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला २० ते २५ जागा मिळतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. तर उर्वरित जागा मविआला असतील. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा स्ट्राइक रेट सर्वाधिक असेल त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार आणि मग उद्धव ठाकरे गटाचा नंबर लागेल, असा अंदाज ताडवे यांनी व्यक्त केला.