साक्षीदार | १३ ऑक्टोबर २०२३ | देशभरातील लाखो लोक आज देखील पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनेचा लाभ घेत असतात कारण या योजनेतून अनेकांना फायदा व सुरक्षित असल्याने ते फायदेशीर ठरत आहे. या सरकारी योजनांमुळे सामान्य लोकांना भविष्यासाठी मोठा निधी जमा करता येतो.
यातच जर तुम्ही देखील तुमच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या काही सुरक्षित योजनेबद्दल माहिती देणार आहोत. या योजनांमध्ये तुम्ही बिनधास्त गुंतवणूक करून तुमच्या भविष्यासाठी लाखोंचा निधी सहज जमा करू शकतात. चला मग जाणून घेऊया या जबरदस्ती योजनांबद्दल सविस्तर माहिती.
महिला सन्मान प्रमाणपत्र
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र सरकारने विशेषत: महिलांसाठी सुरू केले आहे. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना जून 2023 मध्ये सुरू करण्यात आली आहे. महिला या योजनेत 2 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकतात. या गुंतवणूक योजना मार्च 2025 पर्यंत म्हणजेच 2 वर्षांच्या कालावधीसाठी खुल्या आहेत.
ही योजना महिलांना 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीचा पर्याय देते. यानंतर गुंतवणुकीच्या रकमेवर 7.5 टक्के दराने व्याज मिळते. खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर 40 टक्के रक्कम काढण्याची तरतूद आहे. तुम्ही MSSC योजनेत 2 वर्षांसाठी 2 लाख रुपये गुंतवल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 2.32 लाख रुपये मिळतील. ही योजना अगदी FD प्रमाणे काम करते.
किसान विकन पत्र योजना
किसान विकास पत्र योजनेमध्ये वार्षिक 7.5 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. या योजनेत गुंतवणुकीची प्रक्रिया रु. 1000 पासून सुरू होते. याद्वारे तुम्ही 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करू शकता. यामध्ये गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही.
तुम्ही संयुक्त खाते उघडू शकता. यासोबत नॉमिनीची सुविधाही उपलब्ध आहे. सरकार आपल्या गुंतवणुकीवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. जर तुम्ही किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला 115 महिन्यांच्या गुंतवणुकीवर दुप्पट नफा मिळेल. हे खाते 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी देखील उघडले जाऊ शकते.