योजनांची घोषणा नाही तर थेट पूर्तता करणारे महायुती सरकार..!
Social Elements साक्षीदार न्युज ; – पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने आज पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या अर्थसंकल्पाची नोंद ऐतिहासिक अर्थसंकल्प म्हणून होईल अश्या महत्वाकांक्षी व दुरोगामी घोषणा त्यात करण्यात आल्या आहेत. महिला, शेतकरी, युवक, विद्यार्थी, निराधार, वंचित घटकांच्या अपेक्षांची पूर्तता करणारा हा अर्थसंकल्प आहे. विविध योजनांची फक्त घोषणाच नाही तर जुलै २०२४ पासून त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी केली जाणार आहे.
👉🏽 Orion English Medium State Board शाळेच्या विरुद्ध शिक्षकाचे आमरण उपोषण
शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात मोठी घोषणा म्हणजे शेतीपंपाचे संपूर्ण वीजबिल माफ व भविष्यात शेतकऱ्यांना मोफत वीज मिळेल अशी तरतूद करण्यात आली आहे. तसेच याआधी मिळालेले दुष्काळी अनुदान, पीकविमा व आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ५००० हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदान देण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. खान्देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यासोबतच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या ६००० कोटींच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता, १ रुपयात पीकविमा योजना सुरु ठेवण्यास मान्यता आदी अनेक निर्णय शेतकऱ्यांना दिलासादायक ठरणार आहेत.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून २१ ते ६० वयोगटातील महिलांना शासनातर्फे दीड हजार रूपये प्रदान करण्यात येतील. मुलींना मोफत उच्च शिक्षणासारखी महत्त्वाची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आलीय.मोदी सरकारच्या लखपती दीदी योजना महाराष्ट्रातही राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी महिला बचत गटांची संख्या ७ लाखांवर नेण्यात येईल. तसेच गटांच्या निधीत १५ हजारांवरून ३० हजार वाढ करण्यात आली आहे.
येणार्या काळातील समृद्ध महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार करुन सादर केलेल्या या अर्थसंकल्पाबद्दल मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मा.उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तथा मा.उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब, आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार !