साक्षीदार | २१ ऑक्टोबर २०२३
लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी तीर्थक्षेत्र भगवानगड येथे सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी अखंडितपणे सुरू ठेवली आहे. यंदाचा मेळावा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव येथे मंगळवारी दि. २४ आयोजित केला आहे. शिवशक्ती परिक्रमा यशस्वी झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या मेळाव्यास नाशिक जिल्ह्यातून जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित राहून तो यशस्वी करण्याचे आवाहन बैठकीत करण्यात आले.
या मेळाव्याला दरवर्षीप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील समाजबांधवांनी उपस्थित राहण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी आढावा बैठक नुकतीच झाली. दसरा मेळावा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून, या मेळाव्याचे मुख्य प्रयोजन समाजातील उपेक्षित, शोषित, वंचितांच्या न्याय हक्कासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जिल्ह्यातील समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन क्रांतिवीर वंसतराव नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी केले. बहुजनांना दिशा देण्यासाठी हा मेळावा असल्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गामणे यांनी सांगितले. मेळाव्याच्या नियोजनासाठी तालुका व गावनिहाय बैठका सुरू असल्याचे युवा नेते उदय सांगळे म्हणाले.
बैठकीस आ. किशोर दराडे, आ. सुहास कांदे, विक्रांत चांदवडकर, डी. के. जगताप, बाळासाहेब वाघ, प्रकाश घुगे, सचिन दराडे, गणेश धात्रक, गोरख बोडके, विक्रम नागरे, विशाल पालवे, सुदाम ढाकणे, शरद बोडके, गोविंद घुगे, साहेबराव आव्हाड, वाल्मीक सांगळे, पी. आर. गिते, दामोधर मानकर, नारायण काकड, मनीषा बोडके, पुष्पा आव्हाड, प्रल्हाद काकड, वसंतराव विंचू आदी उपस्थित होते.