साक्षीदार | २८ ऑक्टोबर २०२३ | २० कोटी रुपयांची मागणी करीत उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. हि धमकी त्यांना एका अनोळखी व्यक्तीने ईमेल द्वारे दिली आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे २० कोटी रुपयांची मागणी केली आहे आणि जर पैसे दिले नाहीत तर अंबानी यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 27 ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्या ईमेल आयडीवर धमकीचा ईमेल पाठवला होता. धमकीच्या ई-मेलमध्ये लिहिले होते की, “तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत, तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर आहेत”. हा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारी यांच्या तक्रारीच्या आधारे, गामदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.