राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे – कास्टलेस इंडिया
साक्षीदार न्युज । विविध प्रसार माध्यमांच्या अतिरेकी उपयोगातून जातीजातीत वाटला जाणारा समाज आणि त्याचा विद्यार्थी मनावर निर्माण होणारा पगडा दाखविणारे महेश कौडिण्य लिखीत दिग्दर्शित बालनाट्य ‘कास्टलेस इंडिया’ श्री गो.से.हायस्कूल पाचोरा यांनी सादर केले. विद्यार्थ्यांच्या मनात महापुरुषांच्या केवळ एका समाजासाठी संकुचित विचाराने निर्माण होणाऱ्या प्रतिमा उंचावून जातीयतेच्या पलिकडे या राष्ट्रपुरुषांचे कार्य बालप्रेक्षकांना कळावे. विद्यार्थ्यांच्या मनात जातीयतेचे सामाजिक चित्र नष्ट होवून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे मनोरंजनातून उद्बोधन करणाऱ्या या बालनाट्यात ललित आंबेकर, गीत महाजन, आयुष निकम, सार्थक चिंचोले, धवल सूर्यवंशी, आर्यन तडवी, कार्तिकी पाटील, दिव्यराज खैरनार, स्तवन भट, नेहा महालपुरे, देवश्री कासार, चेतन सोनवणे, भुवन्य सूर्यवंशी, यज्ञेश चौधरी, देवांश महाजन, सृष्टी वाघ, सृष्टी शिंपी, सायली सोनार, नेहा महालपुरे या बालकलावंतांनी अभिनय केला. तांत्रिक बाजू सुबोध कांतायन (रंगभूषा), रविंद्र जाधव (प्रकाशयोजना), सोनाली सूर्यवंशी (वेशभूषा), सुखदा पाटील (पार्श्वसंगीत) या तंत्रज्ञांनी सांभाळल्या.
गावाबद्दल आपुलकी जपण्याचा संदेश देणारे – वारसा
ज्याप्रमाणे आपण समाजाचे देणे लागतो, त्याचप्रमाणे आपण ज्या गावात राहतो त्या गावाचेही देणे लागत असतो. गावातून बरेच तरुण नोकरीच्या निमित्ताने शहरात जातात. शहरातील धकाधकीच्या जीवनात आपले मनःस्वास्थ्य हरवून घेत असल्याची, त्यांची खंत असते. गाव सोडून जाणाऱ्या तरुणांचे अनुकरण का करावे? याचा प्रश्न लहान मुलांना पडला आहे. गावातच राहून गावाची प्रगती करण्याचा पूर्वजांचा वारसा टिकवून ठेवण्याचा निर्धार मुलं करतात. जय गणेश फाऊंडेशन भुसावळ यांनी सादर केलेल्या पूनम जावरे लिखीत व सुमित पाचपांडे दिग्दर्शित वारसा या बालनाट्यात कुणाल महाजन, वेदांत कोळी, नीलिन महाजन, आदित्य चौधरी, जय पाटील, विजय खराटे, कुणाल बोरसे, सोनू भालेराव, मंगेश खुंड, हर्षल शहा, अश्विनी सुरवाडे, श्रध्दा बोरवले, साक्षी पाटील, खुशी कोळी, प्रणाली पाटील, प्रियंका राजपूत, भूषण पाटील, श्रीराम नेवे, जगदीश कोळी, रेश्मा पाटील, हेमांगी जाधव या बालकलावंतांनी अभिनय साकारला. तांत्रिक बाजू प्रतीक बाणाईत (पार्श्वसंगीत), प्रितीशा पाटील (प्रकाशयोजना), पूनम जावरे (रंगभूषा), मोहिनी पाटील (वेशभूषा), गायत्री सनांसे (नेपथ्य), गौरी सनांसे (रंगमंच व्यवस्था) या तंत्रज्ञांनी केल्या.
विभक्त कुटुंबातील मुलांची मानसिकता मांडणारे आम्ही धृव उद्याचे
एकत्र कुटुंब पध्दती सोडून विभक्त कुटुंब व्यवस्था आणि त्यातून मुलांच्या मनावर होत असलेला परिणाम सांगणारे ज्ञानेश्वर गायकवाड लिखीत किरणकुमार अडकमोळ दिग्दर्शित आम्ही होवू धृव उद्याचे हे बालनाट्य समर्पण संस्था संचलित श्रीमती एस.एल. चौधरी प्राथमिक विद्यालय जळगाव यांनी सादर केले. आईवडीलांच्या भांडणाने खचून जाणाऱ्या मुलांना नाटकातील आजी ज्या मुलांच्या आई वडील दोघेही नाहीत ती मुले कसा संघर्ष करतात हे सांगते. त्यातून मुले सकारात्मक विचार करायला लागून, आम्ही मोठ्यांच्या भांडणाकडे लक्ष न देता शिक्षण घेऊन आमचे आयुष्य सुंदर करु व समाजात धृवासारखे अढळ स्थान मिळवू हा निर्णय घेतात. या बालनाट्यात आजीची भूमिका नाविका काकडे हिने केली तर चिन्मय पाटील, लावण्या पाटील, कृष्णा तुपे, मनस्वी पाटील, वैदेही कदम, जयाक्षी लोहार, मृणाल उमाळे, उर्मिला पाटील, मनस्वी पाटील, मनन सोळुंके, निखिल पाटील, कुणाल महाजन, ओजस सूर्यवंशी, दुर्वेश देशपांडे, धवल देशपांडे, तन्मय पाटील, निरज कोळी, मयूर पाटील, यज्ञेश पाटील, लखन सपकाळे, नयन बर्डे हे बालकलावंत होते. वाद्यवादन रुद्र घिनीकर, आदित्य लाड, चिन्मय पाटील, मयुर पाटील यांनी केले. वेदांत देशपांडे (प्रकाशयोजना), किरणकुमार अडकमोळ (रंगभूषा), पवन इंद्रेकर (नेपथ्य), जयेश सैंदाणे (पार्श्वसंगीत) या तंत्रज्ञांनी त्यांना साथ दिली.