Jalgaon fire जळगाव: कांचननगरमध्ये गोळीबारात तिघे जखमी; पूर्ववैमनस्यातून घटना घडल्याची माहिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

Jalgaon fire | साक्षीदार न्यूज | जळगाव: शहरातील शनिपेठ परिसरातील कांचननगर भागात रविवारी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेत तीन युवक जखमी झाले असून, त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

​काय घडलं ?

​प्राप्त माहितीनुसार, कांचननगर भागात दोन युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला. या वादाचे स्वरूप वाढत गेले आणि अखेरीस त्याचे रूपांतर गोळीबारात झाले. या गोळीबारात खालील तीन युवक जखमी झाले:

  • आकाश टपऱ्या
  • गणेश सोनवणे
  • तुषार उर्फ साबू

​गोळीबाराची घटना घडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

- Advertisement -

​पोलिसांचा तपास सुरू

​घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. प्राथमिक चौकशीमध्ये गोळीबार करणाऱ्या दोन जणांची नावे समोर येत आहेत, मात्र पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.

Jalgaon fire

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS