साक्षीदार न्युज ; – जळगाव तालुक्यातील म्हसावद गावातील धनगरवाडा येथून १२ हजार रूपये किंमतीच्या तीन बकऱ्यांची चोरी केल्याची घटना सोमवार २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. गुन्ह्यात एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर रमेश बारेला वय-२१, रा. पिंपडीया जि.खरगोन ह.मु. एरंडोल असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील म्हसावद गावातील धनगरवाडा येथे राहणाऱ्या रिझवान जब्बार खाटीक (वय-२४) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. चिकन शॉप चालवून ते आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता त्यांनी त्यांच्या मालकीच्या ३ बकऱ्या त्यांच्या घरासमोर बांधून ठेवल्या होत्या. दरम्यान संशयित आरोपी शंकर रमेश बारेला याने १२ हजार रूपये किंमतीच्या ३ बकऱ्या चोरून नेल्या. हा प्रकार दुसऱ्या दिवशी सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. दरम्यान याप्रकरणी रिजन खाटीक यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी शंकर रमेश बारेला याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ स्वप्निल पाटील हे करीत आहे.