साक्षीदार | १९ नोव्हेबर २०२३ | राज्यातील मुंबई शहरातील अनेक परिसरात गुन्हेगारीच्या घटना नियमित वाढत असतांना नुकतेच जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना बदलापुरात घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश नगर परिसरातील लकी सलून जवळ रोहन आपल्या मित्रासोबत उभा होता. त्यावेळी अचानक कारमधून सहा ते सात जण खाली उतरले. या टोळक्याने रोहन पाठक (वय २२ वर्षे) याच्यावर तलवारीने हल्ला केला. बदलापूर पश्चिमेकडील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.या घटनेत रोहन पाठक गंभीर जखमी झाला.