‘टायगर ३’ ने केली पहिल्याच दिवशी तुफान कमाई !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १३ नोव्हेबर २०२३ | देशभरात दिवाळीचा सणाचा उत्साह सुरु असतांना सलमान खानच्या चाहत्यांना देखील यंदाच्या दिवाळी सलमान खानने आपल्या नव्या चित्रपट प्रदर्शित केला आहे. ‘टायगर ३’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा रविवारी संपली. हा चित्रपट पाहण्यासाठी सलमान खानच्या चाहत्यांनी थिएटरबाहेर मोठी गर्दी केली होती. टायगरने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटाने रिलीजच्या दिवशीच रेकॉर्डब्रेक कमाई करत नवा रेकॉर्ड सेट केला आहे.

- Advertisement -

सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतीक्षित स्पाय थ्रिलर चित्रपट दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. टायगर फ्रँचायझीच्या तिसऱ्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर अप्रतिम कामगिरी करून दाखवली असून जबरदस्त कमाई केली आहे. नुकताच समोर आलेल्या अहवालांवर विश्वास ठेवला तर, वायआरएफच्या स्पाय थ्रिलर चित्रपट ‘टायगर ३’ ने पहिल्या दिवशी ४४.५० कोटींची कमाई केली आहे. व्हायरल रिपोर्ट्सनुसार, सलमान खानच्या ‘टायगर ३’ ने पहिल्या दिवशी ४० कोटींपार कमाई करत विक्रम रचला आहे. तसेच टायगर हा ३ वर्षांतील चौथा मोठा चित्रपट ठरला आहे ज्याने पहिल्याच दिवशी ४० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

टायगर ३ ने सनी देओलच्या गदर २ चा देखील रेकॉर्ड ब्रेक केला आहे. गदर २ ने पहिल्या दिवशी ४०.१० कोटींची कमाई केली होती. तर सलमानच्या टायगर ३ ने पहिल्या दिवशी ४४.५० कोटींची कमाई केली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबई, दिल्ली-एनसीआर, पुणे आणि बेंगळुरूमध्ये ‘टायगर ३’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांनी सर्वाधिक गर्दी केली होती. ‘टायगर ३’ मधील सलमान खानच्या धांसू एन्ट्रीपासून ते कतरिना कैफच्या जबरदस्त अ‍ॅक्शनपर्यंत सर्वकाही ‘टायगर ३’ मध्ये पाहायला मिळेल. इमरान हाश्मीने त्याच्या ग्रे-शेडेड अवताराने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. ‘टायगर ३’मध्ये सलमान खानच्या अ‍ॅक्शनसोबतच शाहरुख खान आणि हृतिक रोशनचे कॅमिओ देखील पाहायला मिळत आहेत. ‘टायगर ३’चे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले असून चित्रपटाचे लेखन आदित्य चोप्राने केले आहे. सध्या सगळीकडे ‘टायगर ३’ या चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS