जळगाव ;– भाजपला रामराम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या माजी खासदार उन्मेष पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मंत्री गिरीश महाजन आणि आ. मंगेश चव्हाण यांच्यावर टीका केली. जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, करण पवार, नानाभाऊ महाजन, विराज कावडिया यावेळी उपस्थित होते.
उन्मेष पाटील म्हणाले कि , गिरीश महाजन हे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीही केलेले नाही, शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मिळाले नाही, पोखरा योजनेचा लाभ मिळालेला नाही, गिरणा बलून बंधाऱ्यासाठी निधी मिळवू शकलेले नाहीत. कॅबिनेटमध्ये त्यांनी हे विषय कधीच लावून धरलेले नाहीत, कॅबिनेटची बैठक होते त्यावेळी हे झोपा काढत असतात. बाहेर मात्र आपल्यावर टीका करीत असतात त्यांनी आता तोंड सांभाळून बोलावे आपण अधिक खोलात गेलो तर त्यांना जामनेरमधून बाहेर पडू देणार नाही,असा इशारा दिला.
शेतकऱ्यांना प्रवाहात आणण्यासाठी केंद्रात सहकार मंत्रालय निर्माण करण्यात आले. अमित शहा त्या खात्याचे मंत्री आहेत. ते शेतकऱ्यासाठी निर्णय घेत असतांना जिल्ह्यातील मंत्री मात्र त्यांच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आहेत.
भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी ठेकेदारांना ब्लॅकमेलसह प्रवीण चव्हाण प्रकरणात उन्मेश पाटील यांचा हस्तक्षेप होता म्हणून पक्षाने त्यांचं तिकीट कापलं, असा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला आहे. यावर उन्मेष पाटील यांनी म्हटले कि,, मंगेश चव्हाण हे राजकारणात साडेतीन वर्षाचे. त्यांना ऑक्टोबरमध्ये उत्तर देणार, असे उन्मेष पाटील म्हणाले.