आजाराला कंटाळून तरूणाने घेतला टोकाचा निर्णय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव ; – तांबापूरा येथील एका ४२ वर्षीय प्रौढ व्यक्तीने दुर्धर आजाराला कंटाळून राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी २ जानेवारी रोजी समोर आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सतिष बाबुराव ससाणे असे मृत व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, सतिष ससाणे हे तांबापुरा येथे पत्नी, दोन मुले आणि मुलगीसह वास्तव्यास होते. मिळले ती हातमजुरी करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून ते एका दुर्धर आजारापासून त्रस्त होते. मंगळवारी २ जानेवारी रोजी सकाळी पत्नी कामावर तर मुले बाहेर गेले होते. त्यामुळे ते घरी एकटेच होते. सकाळी पुतण्याला त्यांनी नाश्ता घेण्यासाठी पाठविले. याच दरम्यानात त्यांनी राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. साडेदहा वाजेच्या सुमारास पुतण्या नाश्ता घेवून आल्यावर त्याला काका सतिष ससाणे यांनी गळफास घेतल्याचे दिसताच, एकाच हंबरडा फोडला. परिसरातील नागरीकांनी धाव घेवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले.

Tired Disease

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Cataract Surgery Camp | मोफत शस्त्रक्रियेची सुवर्णसंधी! यावल-रावेरमध्ये मोतीबिंदू...

Cataract Surgery Camp यावल |मिलिंद जंजाळे | यावल-रावेर मतदारसंघात गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा...

Jalgaon Crime News | “गोव्याहून सुट्टीवर आला अन् घात...

Jalgaon Crime News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर...

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

RECENT NEWS