back to top
गुरूवार, ऑगस्ट 21, 2025

आज या राशींना होणार धनलाभ ; वाचा राशिभविष्य !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | १९ नोव्हेबर २०२३

- Advertisement -

मेष – कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दु:खी प्रसंगात सामील व्हा, तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना कळू शकेल. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्त्रोत आहे याचा अनुभव मिळेल. जीवनाच्या धावपळीत आज तुम्ही आपल्या मुलांसाठी वेळ काढाल. त्यांच्या सोबत वेळ घालूं तुम्हाला वाटेल की, तुम्ही आपल्या आयुष्यातील काही महत्वाचे क्षण वाया घालवले आहे. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.

वृषभ – गरज नसलेले कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा, त्यातूनच तुमचा मानसिक कणखरपणा वाढेल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.

- Advertisement -

मिथुन – तुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागेल. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, यासाठी तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो आणि त्यामुळे तुमच्या हातून काही मोठ्या चुका घडू शकतात, याची जाणीव ठेवा. प्रेमाचा प्रवास मधुर पण क्षणकाल टिकणारा असेल. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा.

कर्क – आजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. आज घरात तुम्ही कुणालाही दुखवू नका आणि कुटुंबाच्या गरजा समजून घ्या. डोळे कधीच खोटं बोलत नाहीत आणि तुमच्या जोडीदाराचे डोळे आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत. वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल परंतु, सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की, जेव्हा कधी तुमच्या जवळ रिकामा वेळ असेल आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालावा. स्पर्श, चुंबने, मुके, मिठ्या या सर्वांचेच वैवाहिक आयुष्यात विशेष महत्त्व असते. त्या महत्त्वाचा आज तुम्हाला अनुभव येईल.

सिंह – तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे या समस्येशी दोन हात करू शकेल. आजचा दिवस जगण्याचा या भावनेने मनोरंजनावर पैसा आणि वेळ खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूंमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाइल वर कुठल्या सिनेमा पाहू शकतात.

कन्या – चार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. कर्मकांडे अथवा शुभकार्याचे सोहळे घरीच केलेले चांगले ठरतील. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल. आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकतात आणि टीव्ही वर बरेच सिनेमा किंवा प्रोग्राम पाहू शकतात. तुमचा एखादा जुना मित्र येण्याची शक्यता आहे आणि तो तुमच्या जोडीदाराबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल.

तूळ – आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. जर तुम्हाला वाटते की, तुमच्याकडे पर्याप्त धन नाही तर, आज घरातील कुणी मोठ्या व्यक्तीकडून धन संचित करण्याचा सल्ला घ्या. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल.

वृश्चिक – तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. तुम्हाला वाटले त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करेल. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे, अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत.
धनु – घरगुती काळजी तुम्हाला बेचैन करेल. आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. तुमचा/तुमची जोडीदार आज एक तुमच्यासाठी देवदूतच होऊन येणार आहे, या क्षणांचा आनंद लुटा. आज वेळ व्यर्थ कामात खराब होऊ शकतो. विवाहानंतर पापाचं रुपांतर पुजेत होतं आणि आज तुम्ही भरपूर पुजा करणार आहात.

मकर – आजचा दिवस लाभदायक असून, तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी भरलेला आहे. वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल परंतु, सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की, जेव्हा कधी तुमच्या जवळ रिकामा वेळ असेल आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालावा. तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईझ मिळू शकेल.

कुंभ – अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिस मध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा जर तुम्ही असे केले नाही तर, तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. नातेवाईकांना भेट देण्याचा अनुभव तुम्हाला वाटला त्यापेक्षा बरा असेल. जे प्रेमात आकंठ बुडालेले असतात, त्यांना प्रेमगीत ऐकू येते. आज तुम्हाला ते ऐकू येईल, ज्याने तुम्ही बाकी सगळं विसरून जाणार आहात. विना कुठल्या पूर्व सूचनेने आज तुमचा कुणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो ज्यामुळे तुमचा किमती वेळ त्यांची खातिरदारी करण्यात व्यतीत होऊ शकतो.

मीन – छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. अचानक प्रणयाराधन करायला मिळाल्याने तुम्ही गोंधळून जाल. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. रोमँटिक गाणी, सुगंधी मेणबत्त्या, रुचकर जेवण आणि थोडीशी मदिरा; तुमच्या जोडीदारासमवेत या सगळ्याचा आस्वाद घेणार आहात.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Domestic Violence | यावल येथे कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार; पाच...

Domestic Violence | साक्षीदार न्यूज | यावल येथील पोलीस ठाण्यात एका महिलेने आपले पती, सासू, जेठ, जेठाणी आणि नणंद यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार आणि हुंड्यासाठी...

Electric shock | वरखेडी गावात करंट लागल्याने पाच जणांचा...

Electric shock एरंडोल | साक्षीदार न्यूज | आज सकाळी तालुक्यातील वरखेडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली. गावालगतच्या म्हसावद रस्त्याजवळील शेतात कामासाठी जात असताना वीज...

CM Rekha Gupta Attacked | भाजपच्या मुख्यमंत्र्याच्या जनता दरबारात...

CM Rekha Gupta Attacked साक्षीदार न्यूज । आज, २० ऑगस्ट २०२५ रोजी जनता दरबारात एका ३५ वर्षीय तरुणाने हल्ला केला, ज्यामुळे राजधानीत खळबळ उडाली...

RECENT NEWS